आयटीसीची व्हिटॅमिन सी आणि झिंकयुक्त जेलीमल्स इम्युनोझ – जेलीज बाजारात दाखल

लहान मुलांमधील रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी मदत करतात .मुलांना दररोज २ जेली दिल्यास ‘व्हिटॅमिन सी’चा ५०% RDA आणि ‘झिंक’चा १५% RDA मिळेल असा दावा कंपनीने केला आहे

मुंबई : जेलीमल्स या जेली सेगमेंटमधील आयटीसी च्या कन्फेक्शनरी ब्रॅण्डने, आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत व्हिटॅमिन सी व झिंक यांनी समृद्ध असलेली जेलीमल्स इम्युनोझ ही जेलीज बाजारात आणली आहेत. लहान मुलांमधील रोगप्रतिकार यंत्रणा बळकट करण्यासाठी या जेलीज मदत करतात. हा ब्रॅण्ड लहान मुलांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे आणि कोव्हिड-१९ साथीच्या सुरुवातीला या ब्रॅण्डने ‘डू द फाइव्ह’ (Do the 5) हे लहान मुले कोविड-१९च्या प्रसाराला प्रतिबंध कसा करू शकतात हे सांगणारे लहान मुलांना आवडेल असे जागरूकता निर्माण करणारे गाणेही आणले होते. हे गाणे WHOने केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे तयार करण्यात आले होते. या संदर्भात एक साहजिक असे पुढील पाऊल म्हणून लहान मुलांच्या भल्यासाठी ब्रॅण्डने उत्पादनही बाजारात आणले आहे.
त्याचप्रमाणे, न्यू नॉर्मल (नवी जीवनशैली) जगाबद्दल मुलांचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी जेलीमल्सने इन्फोलीप मार्केट रिसर्च अँड कन्सल्टन्सी एलएलसी यांच्यामार्फत अनुभवजन्य अभ्यास केला. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता येथील ८-१२ वयोगटातील लहान मुलांच्या केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की, ९४ टक्के मुलांना ‘शाळेत जायला न मिळाल्याचे’ दु:ख वाटत आहे, तर ९० टक्क्यांहून अधिक मुलांना ‘मित्रांना प्रत्यक्षात भेटण्याची’ खूप इच्छा आहे. एकंदर या नवीन परिस्थितीत रोगप्रतिकारशक्तीला पाठबळ देण्याशिवाय पर्यायच नाही. ‘सुपरपॉवर’ मिळाली तर तिचा वापर कोविड-१९ पासून ‘लोकांना वाचवण्यासाठी (५६%) आणि या आजारावर उपाय शोधण्यासाठी (१८%)’ करू असे ७४ टक्के मुलांनी सांगितले. आपल्याला आईवडील व कुटुंबियांची खूप काळजी वाटते, असे ३८ टक्के मुलांनी सांगितले. याशिवाय डॉक्टर्स, सैनिक, मित्र व प्राण्यांना वाचवणे; विषाणूचा संसर्ग तपासण्यासाठी चाचण्या करणे यांवर याखालोखाल भर देण्यात आला.
या लाँचवर प्रतिक्रिया देताना आयटीसी लिमिटेडच्या चॉकलेट, कॉफी, कन्फेक्शनरी आणि न्यू कॅटेगरी डेव्हलपमेंट-फूड्स विभागाचे सीओओ अनुज रुस्तागी म्हणाले, “लहान मुले केंद्रस्थानी असलेला एक ब्रॅण्ड म्हणून, आमच्या उत्पादनांद्वारे व्हिटॅमिन सी व झिंकचा डोस दररोज देऊन लहान मुलांच्या आरोग्याला बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमच्या “डू द फाइव्ह” (Do the 5) या व्हिडिओप्रमाणेच आईवडील व लहान मुले दोघांसाठी मजेशीर व आकर्षक करून आम्ही ‘जेलीमल्स’च्या माध्यमातून हे साध्य करत आहोत. जेलीमल्स इम्युनोझ ३० ग्रॅम आणि १०८ ग्रॅम अशा २ SKUsमध्ये अनुक्रमे रुपये १० व रुपये ५० अशा किमतीला उपलब्ध असतील.

 326 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.